4kNews कामोठे दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा, डेरवली येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने विविध आकर्षक आकाशकंदील तयार केले.

बालभारती कार्यशिक्षण समितीचे सदस्य विद्याधर म्हात्रे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आकाशकंदील बनविण्याचे तंत्र आणि सोप्या पद्धतींचे मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला आणि सर्जनशीलतेला वाव मिळाला.

पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकाशकंदील तयार करत विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला. यावेळी मुख्याध्यापिका मानसी भोसले, शिक्षक रवींद्र रोटकर, विजेता पाटील आणि वर्षा पाटील उपस्थित होते.

