4kNews कामोठे दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे पनवेल शहराध्यक्ष प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन ९ नोव्हेंबर २०२६ रोजी साईनगर, जुने पनवेल येथील गणेश मंदिरात करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे आणि युवा नेते अनिकेत संसारे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यानिमित्त महिला आघाडीच्या वतीने गरीब व गरजू महिलांना १०० साड्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विविध तालुक्यांच्या पक्षाध्यक्षांचा स्वाभिमानी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची जबाबदारी पनवेल महानगराध्यक्ष निलेश कांबळे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वीकारली आहे. रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमासाठी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांसह पत्रकारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

