35 गावांची सूत्रे महिलांच्या हाती; ग्रामीण राजकारणात नवा रंग
पनवेल (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात येत्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आज मंगळवारी पनवेल तहसील कार्यालयात तहसीलदार विजय पाटील व नायब तहसीलदार भालेराव यांच्या उपस्थितीत एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षणाची सोडत पार पडली.

महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले असून तब्बल ३५ गावांचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
आरक्षणाची तपशीलवार माहिती अशी :
अनुसूचित जातीसाठी: नेरे, करंजाडे
अनुसूचित जाती (महिला): सावळे
अनुसूचित जमातीसाठी: आपटा, पोसरी, मालढुंगे, कर्नाळा, गव्हाण, खैरवाडी, नानोशी, बारवई, शिरवली, कानपोली, वाजे
नागरिकांचा मागास प्रवर्ग: कोन, शिवकर, चावणे, नितळस, हरिग्राम, वांगणी तर्फे वाजे, तुराडे, चिंध्रण, वडघर
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): खानावळे, वाघीवली, आकुर्ली, दापोली, वाकडी, सांगुर्ली, ओवळे, देवळोली, आदई, पोयंजे
सर्वसाधारण: दिघाटी, विचुंबे, शिरढोण, गिरवले, खानाव, मोबे, वलप, देवद, चिपळे, पळस्पे, कोळखे, कसळखंड, साई, नांदगाव, कुंडेवहाळ, कराडेखुर्द, केळवणे, वहाळ, वावंजे, गुळसुंदे

सर्वसाधारण (महिला): पालीदेवद, चिखले, पारगाव, उलवा, तरघर, खेरणेखुर्द, केवाळे, पालेबुद्रुक, वावेघर, भाताण, जांभिवली, वारदोली, उमरोली, भिंगार, सोमटणे, न्हावे, दुंदरे, उसर्लीखुर्द
या आरक्षणामुळे ग्रामीण भागातील राजकारण नव्या उत्साहात रंगणार असून अनेक नव्या नेतृत्वांना पुढे येण्याची संधी मिळणार आहे.
