पनवेल प्रतिनिधी :- रेल्वे पोलीस आयुक्तालयातील व पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी सोमनाथ इंगवले यांचा मुलगा नितेश सोमनाथ इंगवले हा कामोठे येथे क्लासला
जात असताना सेक्टर ३४ कामोठे येथे त्याला एक पर्स मिळून आली त्या पर्समध्ये जवळपास अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र होते, हे सोन्याचे दागिने पहिल्या नंतर, नितेश याने या पर्सची माहिती घरी वडील आणि आईला दिली,

ही माहिती मिळाल्या नंतर हे दागिने स्वतः कडे न ठेवता , नितेश चे वडील सोमनाथ इंगवले आणि मुलगा नितेश यांनी जवळील कामोठे पोलिस ठाण्यात जाऊन सापडलेल्या दागिन्यांची माहिती कामोठे पोलिसांना दिली आणि हे सोन्याचे मंगळसूत्र कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले, त्या नंतर कामोठे पोलिसानी मंगळसूत्र हरवलेल्या महिलेचा शोध लावला आणि महिलेची अधिक चौकशी तसेच खात्री करून ते सोन्याचे मंगळसूत्र त्या महिलेला परत केले. हे सोन्याचे मंगळसूत्र पाहून महिलेने नितेश इंगवले याचे आभार मानले, आणि चांगले कार्यकेल्या बद्दल कामोठे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नितेश इंगवले याचे कौतुक करून त्याच्या कार्याचा सत्कार केला.
