नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध

पनवेल(प्रतिनिधी) बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्यावतीने आज (दि. १०) जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.  बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार तातडीने थांबिवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हजारोंच्या संख्येने मानवी साखळी करत हे आंदोलन करण्यात आले.

 
   या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, तेजस  कांडपिळे, अभिमन्यू पाटील, दर्शना भोईर,  नीता माळी, नेत्रा पाटील, अजय बहिरा, मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, राजू सोनी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती कोळी, संजय जैन, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, अमित जाधव, किशोर सुरते, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, कामोठे अध्यक्ष रवी जोशी,रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, विजय पाटील, बिना गोगरी, संध्या शारबिद्रे, अनेश ढवळे, हर्षवर्धन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, केदार भगत, विद्या तामखेडे, अनंत गायकवाड अविनाश गायकवाड, योगेश लहाने, डॉ. कृष्णा देसाई, भीमराव पोवार त्याचबरोबर विविध संस्था संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी आंदोलनांच्या अनुषंगाने २५७० हिंदू बंधुभागिनींनी आपली नोंद केली होती. यावेळी भारत माता की जय, जय जय श्रीराम, बंद करा बंद करा अत्याचार बंद करा, एक है तो सेफ है अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर फलक दर्शवण्यात आले.


        बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी, आदिवासी व दलित हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरता वाद्यांच्या अमानवीय अत्याचारांपासून मुक्ती मिळावी .


बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून आली आहे.  बांगलादेशात अलीकडेच सत्तांतर झाले व महंमद युनूस यांच्या नेतृत्वात अराजकाचे सरकार स्थापित झाले आहे. जेव्हापासुन हे सरकार अस्तित्वात आले तेव्हा पासुन बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू हे कट्टरपंथी मुस्लिम अराजकतावादी मुस्लिम यांच्या अत्याचाराचे बळी जात आहेत. हिंदू व इतर अल्पसंख्याक समुदायातील जनतेवर मुस्लीम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हल्ले, हत्या, लूटमार, दरोडे, जाळपोळीच्या घटना, महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याक समुदायातील मुलं व महिलांवरील अमानवीय अत्याचार हा भारतातील हिंदू समुदायाला चिंता करायला लावणारा आहे. हे सर्व अत्याचाराचे प्रकार बांगलादेशातील सरकारी यंत्रणा व पोलीस यांच्या देखरेखीत घडत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संरक्षण यंत्रणा तिथल्या अल्पसंख्याकांना वाचवण्याऐवजी 

मूकदर्शक बनल्या आहेत. त्याच वेळी बांगलादेशमधील हिंदूंनी त्यांच्यावरील अन्याय, अत्याचारांनंतर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथल्या सरकारने त्यांचा आवाज दाबून ठेवला आहे. तिथल्या हिंदूंनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र बांगलादेशी सरकारने हिंदूंची आंदोलनं चिरडली. इस्कॉनचे हिंदू धर्मगुरु श्री चिन्मय दास यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली. त्यांच्या वकीलांची हत्या करण्यात आली. त्यांच्या समर्थकांना भारताचा व्हिसा असताना देखील भारतात येण्यास मनाई करण्यात आली. या सर्व अत्याचारांची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. त्यामुळे तातडीने अत्याचार थांबण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने मानवी साखळीतून जोरदार मागणी करण्यात आली. त्याचबरोबर अत्याचाराविरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top