पनवेल दि.२३(वार्ताहर): प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पळस्पे येथील पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला आयपीएस अंकुश शिंदे यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली.

यावेळी शाळेचे चेअरमन डॉ.जयंत भोईर यांनी शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अंकुश शिंदे यांनी शाळेची पाहणी केली तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका राजेश्री जगदाळे आदींसह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
