पनवेल : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पनवेल, डी डी विसपुते कॉलेज देवद, विचुंबे आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विदयमाने डी. डी. विसपुते कॉलेज येथील विद्यार्ध्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील, पनवेल मधील प्रख्यात डॉ. गिरीश गुणे, आदर्श शिक्षण संस्था चे अध्यक्ष धनराज विसपुते,

डी डी विसपुते फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. जैन सर, माजी नगरसेवक नितिन पाटील, माजी नगसेवक अजय बहिरा, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य चे खजिनदार संतोष घोडींदे, आरटीओ पनवेल च्या वतीने जयंत चव्हाण, धोटे, चामे व पवार मॅडम, महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे विवेक खाडये, सुजित भागत, सचिन खिस्मतराव, सतीश आचार्य, अभिजित लगड, निलेश मनोरे, कुणाल गायकवाड, महेंद्र कांबळे अमित गुप्ता, नंदकुमार साळुंखे, महेश डोळस आदि मान्यवर उपस्थित होते. या अभियानात आमदार विक्रांत पाटील यांनी वाहन चालवताना होणारे अपघात रोखण्यासाठी आपल्या स्वतः पासून काळजी घ्यावी असे आवाहन सर्वांना केले.

डॉ. गिरीश गुणे यांनी अपघात घडल्यावर वेळीच कोणते प्रथमोपचार करावेत या बद्दल माहिती दिली त्याच बरोबर एखादा जीव कसा वाचला जाईल ही काळजी घ्यावी.

धनराज विसपुते यांनी विसपुते कॉलेज चा रस्ता सुरक्षा अभयानांतर्गत 2009 साला पासून प्रत्येक वर्षी कसा योगदान असतो या बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी 500 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
