पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक महिला कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रफिना मोहम्मदरजा अल्लाहखातून अन्सारी (21 रा.जुई गाव) असे या महिलेचे नाव असून उंची 5 फुट, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे असून अंगात सफेद रंगाचा टॉप व ब्राऊन रंगाची ओढणी तसेच पायात सफेद रंगाची चप्पल व सोबत ग्रे रंगाची बॅग आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने कामोठे पोलीस ठाणे किंवा पो.हवा.शेलार यांच्याशी संपर्क साधावा.
