नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

पतीनेच सुपारी देवून मारले आपल्या पत्नीला ; 3 अटकेत


पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः उलवेमध्ये अलवीना किशोरसिंग उर्फ अलवीना अदमली खान (27) या विवाहितेची तिच्याच पतीनेचे सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने तपास करत मृत विवाहितेचा पती किशोरसिंग राजपूत तसेच हत्येची सुपारी घेणारी महिला अलिशा त्यागी आणि तिची सहकारी डिंपल या तिघांना अटक केली आहे. मात्र, ज्या दोघा मारेकर्‍यांनी अलवीना हिची हत्या केली, ते मारेकरी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


या घटनेतील मृत अलवीना अदमली खान पती किशोरसिंग राजपूत याच्यासोबत उलवे, सेक्टर-5 मधील विजय लक्ष्मी टॉवरमध्ये राहत होती. अलवीना आणि तिचा पती किशोरसिंग दोघेही त्याच परिसरात मेडीकल शॉप चालवत होते. अलवीना मुंबईतील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. तेथून ती रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास उलवे येथील घरी परतत असताना तिच्या घरापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर अज्ञात मारेकर्‍याने तिला गाठून तिच्या गळ्यावर धारदार चाकुने वार करुन पलायन केले होते. यात अलवीनाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उलवे पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुध्द विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती.

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-2 कडून सुध्दा या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात मृत अलवीना आणि तिचा पती किशोरसिंग या दोघांमध्ये मागील काही वर्षापासून आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद सुरु असल्याचे तसेच दोघेही घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने संशयावरुन किशोरसिंग याची उलटतपासणी केली. सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानेचे सुपारी देऊन अलवीनाची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली.
घटस्फोट देत नसल्यामुळे हत्या…
अलवीना हिने किशोरसिंगला व्यवसायासाठी 15 लाख रुपये दिले होते. सदर पैसे ती किशोरसिंग याच्याकडे मागत होती. त्यातच अलवीनाचे दुसर्‍या व्यक्तीसोबत संबंध जुळल्याने किशोरसिंग याने अलवीनाकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र, पैसे दिल्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचे तिने किशोरसिंगला बजावले होते. त्यामुळे या दोघांमध्ये गेल्या काही वर्षापासून वाद सुरु होता. 15 लाख रुपये दिल्यानंतर देखील अलवीना घटस्फोट देणार नसल्याची भिती किशोरसिंग याला होती. त्यामुळेच त्याने सुपारी देऊन अलवीनाची हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


हत्येसाठी 7 लाखाची सुपारी…
पोलिसांनी केलेल्या तपासात किशोर सिंग याने अलवीनाची हत्या घडवून आणण्यासाठी उलवेत राहणार्‍या अलिशा त्यागी या महिलेला 7 लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील 5 लाख रुपये त्याने दिले होते, हत्या झाल्यानंतर उर्वरित 2 लाख रुपये देण्याचा त्यांच्यामध्ये व्यवहार ठरला होता. त्यानुसार अलिशा त्यागी हिने तिची सहकारी डिंपल हिच्या ओळखीतून पंजाब येथून एका मारेकर्‍याला बोलावून घेतले होते. त्यानेच अलवीनावर पाळत ठेवून तिची भररस्त्यात गळा चिरुन हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी किशोरसिंग राजपूत, अलिशा धनप्रकाश त्यागी (38) आणि डिंपल चरणजीत फत्तेसिंह कौर उर्फ डिंपल (34) या तिघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी फरार दोघा मारेकर्‍यांचा शोध सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top