नवीन बातम्या
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
How to Build a WooCommerce Print Shop Order Form With File Upload
OpenStation Blog: A better way to use WordPress
Open Channels FM: OCN Week in Review #4
Open Channels FM: Drawing the Line Between Openness and Noise in the Digital World
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत


4kNews कामोठे दि.
पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या खारघर येथील ‘शिवनेरी’ महापौर निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाची आरती चाफेवाडी व फणसवाडी येथील आदिवासी वाडीतील महिला, पुरुष तसेच चिमुकल्यांच्या शुभहस्ते भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत समाजातील सर्व घटकांना उत्सवाच्या आनंदात सहभागी करून घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा कौतुकास्पद उपक्रम महापौर नितीन पाटील यांनी राबविला. 



आरतीनंतर महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उपस्थित महिला भगिनींना साडी-चोळी, पुरुष बांधवांना पोशाख, तर चिमुकल्यांना नवीन कपडे देऊन सन्मानित करण्यात आले. सण-उत्सवाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.



यावेळी चाफेवाडी व फणसवाडी येथील क्रिकेट संघांनाही प्रोत्साहन देण्यात आले. स्थानिक युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड वाढावी आणि त्यांना आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी क्रिकेट संघांना बॅट, स्टम्प व बॉल खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे स्थानिक युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा उत्सव आहे. मात्र, या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाल्यास त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. समाजातील गरजू व वंचित घटकांना सोबत घेऊन त्यांच्या आनंदात सहभागी होणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि त्यांना सन्मानाची वागणूक देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. गणरायाच्या साक्षीने आदिवासी बांधवांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याची संधी, सामाजिक एकोपा, आपुलकी आणि माणुसकीचा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्ताने महापौर नितीन पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top