नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पनवेल परिसरातील बाजारपेठेत दाखल झाले विविध प्रकारचे आकाशकंदील

4k समाचार
पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) :  सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी साऱ्यांची लगबग सुरू झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या या सणानिमित्त आकाश कंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहे. हे आकर्षक आकाशकंदील लक्ष वेधून घेत असून यावर्षी आकाश कंदीलांचे पारंपारिक आणि काही नवे प्रकारही बाजारात दाखल झाले आहेत.


  

दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून पनवेल परिसरातील अनेक कुटुंबीय दिवसरात्र जागरण करीत इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करण्याचे काम करीत आहेत . सुमारे दशकभरापासून अनेक कुटुंबीय तयार करीत असलेल्या आकाशकंदिलांना पनवेलसह परिसरातील पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणाऱ्यांकडून मोठी मागणी आहे. सध्या  मिनी आकाशकंदील २० रुपयांपासून महा आकाश कंदील जवळपास १००० रुपयांपर्यंत येथे मिळत असतो. हल्ली इको फ्रेंडली वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. रंगीबेरंगी कापडी, हॉलोग्राफी, मार्बल पेपर यासह फोल्डिंगचे असंख्य प्रकारचे आकर्षक आकाश कंदील विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. त्यात पैराशूट कंदील, आकाशदीप, फायर बॉल, कलश, टोमॅटो बॉल, हॅण्डमेड कापडी तसेच लहान आकाराचे अशा आकाश कंदिलांना चांगली मागणी असून ५० ते ५०० रुपयांपर्यंत भाव आहे. शहरातील अन्य बाजारपेठेतील दुकाने आकाशदिव्यांनी सजली आहेत.

यंदाच्या वर्षी किंमतीत आठ ते दहा टक्क्यांनी वाढगत वर्षीपेक्षा यंदा आकाशदिव्याच्या किंमती ८ ते १० टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, ग्राहकांनी मेड इन चायना आणि प्लास्टिकच्या आकाशकंदिलांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करणाऱ्या विक्रेत्यांकडे दरवर्षी मागणी सातत्याने वाढत आहे. पूर्वीचे कामट्यापासून तयार करण्यात येत असलेले आकाश कंदील आता दिसेनासे झाले आहेत .  देशी बनावटीच्या आकाश दिव्याना जास्त पसंती मिळत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.त्यामुळे बाजारपेठा रंगीबेरंगी कंदिलांनी चांगल्याच सजल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top