नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ५० हजार केळींचे वाटप
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्याकडून फराळरूपी सेवाभावी उपक्रम


4kNews कामोठे दि. 25
पनवेल (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या वतीने फराळ म्हणून तब्बल ५० हजार केळींचे मोफत वाटप करण्यात आले. 



राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिवस पायी वारी करून पंढरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांना उपवासाच्या दिवशी पौष्टिक, ऊर्जादायी आणि सहज उपलब्ध होणारा फराळ मिळावा, या सेवाभावी भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. पंढरपूरातील मुख्य दर्शन रांगा, वारकऱ्यांच्या विसाव्याची ठिकाणे तसेच विविध मठांच्या परिसरात हजारो वारकऱ्यांना केळींचे वितरण करण्यात आले.



या उपक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत सेवाभावाने वितरणाची जबाबदारी पार पाडली. ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या अखंड गजरात आणि विठ्ठलनामाच्या भक्तिमय वातावरणात ही सेवा पार पडल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. उपवासाच्या दिवशी केळी हे पौष्टिक व ऊर्जादायी फळ असल्याने वारकऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. अनेक वारकऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.



या सेवाकार्यात प्रवीण काळबागे, बबन बारगजे, निलेश दराडे, अनिल कोकाटे, तेजस बाबर, शैलेश गवांद, आदर्श सिंग, प्रदीप घुगे, राकेश गायकवाड, निलेश पाटील, बालू मुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वारकऱ्यांची सेवा केली.आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च स्थान देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top