नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक

4kNews कामोठे

अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; तातडीने व्यवस्था सुधारण्याची मागणी
पनवेल, दि. ९ (वार्ताहर) : कळंबोली परिसरातील अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, याप्रश्नी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिडको प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.



गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीतील विविध भागांत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पाण्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.



यावेळी शिवसेना कळंबोली शहर विभागप्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर, शहर संघटिका ज्योती राजेश मोहिते, उपशहर संघटिका निशाताई जाधव, विभाग संघटिका सुनीता चव्हाण, प्रभागप्रमुख महेश गुरव, विक्रम ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विश्वास पेटकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top