4kNews कामोठे दि. 26
नवी मुंबई (प्रतिनिधी) : बौद्ध संस्कृती, धम्मपरंपरा आणि सामाजिक प्रबोधनाशी संबंधित साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राहुल शिवाजी बनसोडे हे ‘बनसोडे एंटरप्रायजेस’च्या माध्यमातून बौद्ध वस्तूंचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायात बुद्धमूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, फोटो फ्रेम, बॅज, धम्मध्वज, पंचशील ध्वज, पताका, दुपट्टे, निळ्या टोप्या, फेटे, पुस्तके, टी-शर्ट, जॅकेट, साड्या आणि विविध प्रकारचे धम्मसाहित्य उपलब्ध आहे.

बुद्धवंदना, धम्मदीक्षा, जयंती उत्सव, सामाजिक मेळावे आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू येथे मिळतात. बौद्ध समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्याचा या व्यवसायाचा प्रयत्न आहे.

सांगली आणि नवी मुंबईत व्यवसायाची केंद्रे
राहुल बनसोडे यांच्या व्यवसायाची केंद्रे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील उपाळे (मायणी) येथील आदर्श निवास परिसरात तसेच नवी मुंबईतील ऐरोली येथील समतानगर परिसरात आहेत. या दोन्ही ठिकाणांहून ग्राहकांना बौद्ध धम्माशी संबंधित विविध वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात.

वस्तूंच्या माहितीसाठी संपर्क साधा
बौद्ध धम्माशी संबंधित साहित्य, महापुरुषांच्या प्रतिमा आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी अधिक माहितीसाठी राहुल शिवाजी बनसोडे यांच्याशी ९१६७९२९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

