नवीन बातम्या
पनवेलमध्ये राज्यस्तरीय जलसा गीत गायन स्पर्धा; सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा सह्याद्री संस्थेतर्फे आतिष साळवी  आणी नंद कुमार कांबळे यांच्या हस्ते  श्री. राहुल शिवाजी बनसोडे यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव
‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात सचिन कांबळे यांच्या हस्ते राहुल शिवाजी बनसोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान
नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; भूमिपुत्रांना प्राधान्य!
राष्ट्र प्रथम’ विचार सर्वदूर पोहोचविण्याची गरज
महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन; ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमातून जवानांना दिवाळीची भेट भारत विकास परिषद, पनवेल शाखेचा स्तुत्य उपक्रम; यंदा १८ हजार फराळ बॉक्स पाठविणार
उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडीच्या नियुक्त्या जाहीर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे
पाणीटंचाई रोखण्यासाठी भरत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पनवेल ग्रामीणमधील ज्येष्ठ शिवसैनिकांची वावंजे येथे बैठक
प्रभाग ११ मध्ये अतिक्रमणांवर कारवाईत दुजाभाव का?
आदिवासी महिलांना व्यवसायासाठी जागा द्या; नगरसेविका मेघना घाडगे यांची मागणी

‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात सचिन कांबळे यांच्या हस्ते राहुल शिवाजी बनसोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान



4kNews कामोठे दि. 26

मसूर (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कांबिरवाडी येथे दिवंगत मातोश्री शहाबाई संपत कांबळे, मातोश्री मालन हरिबा झिमरे आणि दिवंगत संपत गणपत कांबळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मा. राहुल शिवाजी बनसोडे यांना सचिन कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच नवीन हाऊसकीपिंग व जनरल स्टोअर व्यवसायाचे उद्घाटन आयु. भीमराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.



कार्यक्रमाच्या प्रारंभी बौद्धाचार्य आयु. कैलास कांबळे यांनी विधिवत पूजापाठ केला. लेणी संवर्धन, धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. रोहित वाघमारे यांनी जिल्ह्यातील बौद्ध लेण्यांविषयी माहिती दिली, तर दिलीप सावंत यांनी बुद्धधम्माविषयी मार्गदर्शन केले. ऐतिहासिक लेण्यांचे संवर्धन, बौद्ध वारशाचे जतन आणि सामाजिक प्रबोधनाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.



विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ अंतर्गत बौद्ध युवा जागृती परिषदेचे संस्थापक व लेणी संवर्धक कैलास कांबळे, रोहित वाघमारे (वाई), आनंदा कांबळे, संजय कांबळे, स्वप्निल जाधव, प्रीतम आढाव, आकाश एंटंबे, अनुराधा माने, पंचशीला अमोल वाघमारे, अमोल गायकवाड, तानाजी कांबळे, राहुल बनसोडे, गोपीनाथ कांबळे, राखीताई गाडे, सुनंदाताई जावळे, सुरेखाताई कारणे, दिलीप सावंत, किरण कारणे, सदाशिव भंडारे, सनी रामुगडे (आबा, माजी ग्रामपंचायत सदस्य, मसूर), शंकर हरिबा झिमरे, महेंद्र भोल, संगीताताई लोको, रेखाताई लोक्के, वंदनाताई अरुण कांबळे आणि आबासे सोनताटे यांच्यासह विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.



सामाजिक बांधिलकीचा संदेश
दिवंगत व्यक्तींच्या स्मृती जतन करणे, समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीपर्यंत सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये पोहोचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.



कांबळे परिवारातर्फे आयोजन
या कार्यक्रमाचे आयोजन आयु. भीमराव कांबळे, दीपक कांबळे, सचिन कांबळे आणि कांबळे परिवार, मसूर-कांबिरवाडी यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आयु. भीमराव संपत कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा जय नर्सरीचे संचालक, यांनी उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top