नवीन बातम्या
पनवेलमध्ये राज्यस्तरीय जलसा गीत गायन स्पर्धा; सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा सह्याद्री संस्थेतर्फे आतिष साळवी  आणी नंद कुमार कांबळे यांच्या हस्ते  श्री. राहुल शिवाजी बनसोडे यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव
‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात सचिन कांबळे यांच्या हस्ते राहुल शिवाजी बनसोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान
नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; भूमिपुत्रांना प्राधान्य!
राष्ट्र प्रथम’ विचार सर्वदूर पोहोचविण्याची गरज
महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन; ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमातून जवानांना दिवाळीची भेट भारत विकास परिषद, पनवेल शाखेचा स्तुत्य उपक्रम; यंदा १८ हजार फराळ बॉक्स पाठविणार
उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडीच्या नियुक्त्या जाहीर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे
पाणीटंचाई रोखण्यासाठी भरत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पनवेल ग्रामीणमधील ज्येष्ठ शिवसैनिकांची वावंजे येथे बैठक
प्रभाग ११ मध्ये अतिक्रमणांवर कारवाईत दुजाभाव का?
आदिवासी महिलांना व्यवसायासाठी जागा द्या; नगरसेविका मेघना घाडगे यांची मागणी

पाणीटंचाई रोखण्यासाठी भरत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

4kNews कामोठे n

लघु बंधारे, जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासह पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी
पनवेल, दि. 25 (वार्ताहर) : पनवेल तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



तालुक्यातील नद्या, ओढे, तलाव आणि विहिरींची पाहणी करून लघु बंधारे उभारावेत, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, तलावांतील गाळ काढावा आणि भूजल पुनर्भरणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
संभाव्य पाणीटंचाईच्या काळात पशुधनासाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था, टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सुचविले आहे. 



महसूल, कृषी, जलसंधारण विभाग, ग्रामपंचायती आणि पनवेल महानगरपालिकेने समन्वयाने काम करावे. निवेदन मिळाल्यानंतर १५ दिवसांत प्राथमिक पाहणी करून संभाव्य टंचाईग्रस्त क्षेत्रांची नोंद करावी आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी पाटील यांनी केली. पाणीटंचाई निर्माण होण्याची वाट न पाहता प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top