नवीन बातम्या
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष

एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण

4kNews कामोठे
उरण, दि.15 (विठ्ठल ममताबादे) : द्रोणागिरी, उरण येथील एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी फायर अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. 



अग्निशमन विभागाचे उपअग्निशमन अधिकारी अमित कांबळी आणि लीडिंग फायरमन सागर साळुंके यांनी विद्यार्थ्यांना आगीची कारणे, संभाव्य धोके, आग लागल्यानंतर घ्यावयाची खबरदारी आणि विविध पद्धतीने आग विझविण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे आग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता स्वतःचा बचाव करताना इतरांच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 



कार्यक्रमास स्कूलच्या सल्लागार स्वातीताई म्हात्रे, मुख्याध्यापिका मृदुला धोंडी, सहसचिव किरण घरत, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटील, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सूर्यकांत ठाकूर, जेएनपीटी कर्मचारी संदीप पाटील यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे आगीच्या प्रसंगी घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांची विद्यार्थ्यांना प्रभावी माहिती मिळाली.
आग लागल्यास नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाशी ८१०४९६१९४१ किंवा ०२२-६९३६५६०० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top