नवीन बातम्या
पनवेलमध्ये साडेनऊ लाखांची वीज चोरी उघड; एकावर गुन्हा दाखल
सेनेची बांधणी अधिक मजबूत करण्याासाठी पनवेलमध्ये बैठक संपन्न

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पनवेल महानगरपालिकेची शिवसेना शाखा तोड कारवाई परतावली
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %
बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह 
सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान संपन्न

कृषी आधारित उपजीविका प्रकल्पामुळे ग्रामीण उत्पन्नात वाढ


4k सामाचार दि. 1

पनवेल(प्रतिनिधी) तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत, ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून २०१३ पासून राबवत असलेल्या कृषी आधारित उपजीविका (वाडी) प्रकल्पामुळे पनवेल तालुक्यातील २८ गावे आणि ११ पाड्यांतील लहान, अल्पभूधारक आणिआदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होत आहे.पडीक जमिनीला फळबाग आणि भाजीपाला उत्पादनक्षम शेतात रूपांतरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वाडी मॉडेलमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, हंगामी स्थलांतर कमी होण्यास आणि हवामानाशी जुळवून घेणारी शेती करण्यास मदत होते. 



पडीक जमिनीपासून समृद्धीकडे या उपक्रमांतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याकडे अर्धा एकर क्षेत्रावर आंबा फळ बाग लागवडीबरोबर, कुंपणासाठी वनीकरणानाची झाडे, भाजीपाला लागवडीसाठी मदत व प्रोहत्सान दिले जात आहे. तसेच शेतकऱ्यांना मृद व जलसंधारणाचे प्रशिक्षण, ठिबक सिंचन, आणि चांगल्या दर्जाचे बियाणे व खत यासाठी मदत दिली जाते आहे. जमिनीचे वेगाने होणारे तुकडीकरण आणि अधिक उत्पादनाची गरज लक्षात घेऊन, दीपक फर्टिलायझर्सने उच्च घनतेची लागवड पद्धत पद्धतीने सुरू केली आहे. या पद्धतीत फक्त ५गुंठ्यात ५० केशर जातीची आंब्याची रोपे लावली जातात. त्यामुळे जागेचा जास्त उपयोग होतो, फळधारणा लवकर सुरू होते, कीड रोगनियंत्रण सोपे होते आणि उत्पादनात मोठी वाढ होते. आतापर्यंतचे प्रकल्पातील महत्त्वपूर्ण यश म्हणजे   ४३० शेतकऱ्यांकडे आंबाफळ बाग विकसित; तसेच भाजीपाला लागवड सुरू,  ८४.६% वाड्यांमध्ये फळधारणा,  ३८० वाड्यांमध्ये फळधारणा झाली असून २०२४-२५मध्ये ३८,८३९किलोआंबा उत्पादनातून ३४.५६लाख रुपये उत्पन्न, ५५०शेतकऱ्यांनाभाजीपालालागवडीसाठीसहाय्य; सरासरीवार्षिकउत्पन्न ७५,८३३पर्यंतवाढ, ७७३.२५एकर क्षेत्रावर शाश्वत शेती सुरू झाली असून  ७३% कुटुंबांचे हंगामी स्थलांतर कमी झाले किंवा थांबवले आहे.  





  यशाच्या प्रेरणादायी कथा
आता आम्हाला खरंच दिलासा मिळतो,” असे भल्याचीवाडी, तळोजा येथील चंद्रा आणि विकास निरगुडा सांगतात. सहा महिन्याच्या बाळासह फक्त दोन एकर शेतीवरअनियमित पाण्याच्या पुरवठ्यामुळे ते सतत अडचणीत होते. दीपक फर्टिलायझर्सच्या पाणी संसाधन विकास उपक्रमांतर्गत त्यांनी २ एचपी सबमर्सिबल पंप बसवला. यामुळे शेताला शाश्वत पाणी पुरवठा होत आहे. 



या हंगामात त्यांनी काकडी, कारले आणि चौळीची लागवड करून ५७ हजार ५०० इतकेआतापर्यंतचे सर्वाधिक हंगामी उत्पन्न मिळवले. पहिल्यांदाच आमच्या मुलाच्या भविष्याबद्दल सुरक्षित वाटत आहे, असेचंद्रा सांगतात. आमच्या नातवांनाही आता पुढे शिकायची स्वप्ने दिसू लागली आहेत,” असे गाढेश्वर येथील महादी आणि दत्तू दुमणे सांगतात. २.५ एकरशेती असलेल्या या दांपत्याला वाडी प्रकल्पांतर्गत सहाय्य मिळाले. सुधारित पद्धतींमुळे त्यांनी काकडी आणि चौळीचे उत्पादन घेऊन २३ हजार २० रुपये मिळवले, तसेच आंबा विक्रीतूनअतिरिक्त ५५ हजार ९०० रुपये उत्पन्नमिळाले. “पूर्वी आम्ही मजुरीवर अवलंबून होतो; आता आमची शेतीच आमची सोय करते, असे दत्तू सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top