पनवेल, दि.22 (4kNews) ः पनवेल रेल्वे स्टेशन चौकीजवळील आझाद नगर झोपडपट्टीमधील मुख्य रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

सदर इसमाचे अंदाजे वय 65 वर्षे, डोक्याचे केस पांढरे टक्कल पडलेले, दाढी मिशी पांढरी वाढलेली, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 4 इंच आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे 022-27452333 किंवा सहा.पो.नि.सारिका झांझुर्णे यांच्याशी संपर्क साधावा.
