नवीन बातम्या
पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*
आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नितीन ठाकरे यांची पदोन्नती; बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून सत्कार
आंतरराष्ट्रीयअंमली पदार्थ नशा-मुक्ती दिनानिमित्त पनवेलमध्ये जनजागृती कार्यक्रमपनवेल,
फक्त रोख रक्कम चोरणारा सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात
शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा उपक्रम 1 जुलै रोजी
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी बाळा कुंभार तर उरण पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी पृथ्वीराज घोरपडे
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे केरळमधून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत

चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

4knews दि. 26/12/25

“आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवीशिक्षण घेऊन न थांबता कौशल्याधिष्ठित आणि व्यावहारिक शिक्षण आत्मसात करणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर  सिक्युरिटी,इंटीरियर डिझाईनसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी नवी दारे उघडतात,” असे प्रतिपादन सी.के.टी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांनी केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील भागूबाई चांगू ठाकूर कौशल्य विकास केंद्राच्या वतीने महाविद्यालयात आयोजित केलेल्या दोन दिवसीय संपर्क अभियानाच्या  (Outreach Programme) उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. भागूबाई चांगू ठाकूर कौशल्य विकास केंद्राच्या अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी व डिजिटल फॉरेन्सिक, इंटिरियर डिझाईन तसेच फॅशन व अ‍ॅपरेल डिझाईन असे कौशल्याधारित अभ्यासक्रम चालवले जातात.

या अभ्यासक्रमाची  माहिती  अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग तसेच सायबर सिक्युरिटी व डिजिटल फॉरेन्सिक विभाग समन्वयक  समीर कांबळे, इंटिरियर डिझाईन पदवी अभ्यासक्रम समन्वयक आर्किटेक्ट स्वेच्छा गोसावी, इंटिरियर डिझाईन डिप्लोमा अभ्यासक्रम समन्वयक  प्रज्योती देसाई आणि फॅशन व अ‍ॅपरेल डिझाईन विभाग समन्वयक  दीपश्री राठोड यांच्या प्रयत्नांतून हे  संपर्क अभियान राबवण्यात  आले. या उपक्रमास विज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना ठाकूर यांचे  मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी  प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांच्या सोबत अंतर्गत गुणवत्ता  हमी कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. डी. आघाव आणि विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना ठाकूर हे देखील उपस्थित होते. कौशल्य विकासाचे महत्त्व  अधोरेखित करणार्‍या या उपक्रमाची सुरुवात संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांच्या पुढाकाराने आणि  संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लोकनेते  रामशेठ ठाकूर यांच्या  मान्यतेने करण्यात आली. या अभ्यासक्रमांच्या वतीने आयोजित विभागीय प्रदर्शनास उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी भेट देत विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातून बहुमोल मार्गदर्शन केले.या संपर्क अभियानामध्ये चार विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत कनिष्ठ महाविद्यालय येथून ९० विद्यार्थी  श्री. जयराम सोनटक्के, श्री. एम. के. घरत व सौ. तांडेल मॅडम  या तीन प्राध्यापकांसह उपस्थित होते. त्याच दिवशी सी.के.टी. कनिष्ठ महाविद्यालय, पनवेल येथून १५० विद्यार्थ्यांनी  सौ. ज्योती वाघ, सौ. हर्षदा लोखंडे, सौ. माधवी कोळी , श्री. विजय कुमावत , श्री. गणेश पाटील  व श्री. विवेक पाटील या सहा प्राध्यापकांसह या प्रदर्शनास भेट दिली.

शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कामोठे येथून १३२ विद्यार्थी  सौ. अमृता गुरव, सौ. सरिता सोमाणी, आणि सौ. स्मिता शर्मा  या तीन प्राध्यापकांसह उपस्थित होते. त्याच दिवशी रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर येथून ७५ विद्यार्थी  सौ. दुर्गादेवी मौर्या, सौ. अश्विनी कासरेकर,  सौ. स्नेहल  अवळे या तीन प्राध्यापकांसह संपर्क अभियानास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक नम्रता कडू आणि इंग्रजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक कादंबरी पाटील यांनी प्रभावीपणे केले.या संपर्क अभियानादरम्यान विविध विभागांद्वारे अभ्यासक्रमांची माहिती, अभ्यासक्रमाची रचना तसेच करिअरच्या संधी याविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना संबंधित विभागांमध्ये नेऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व विभागीय प्रदर्शने दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक प्रकल्प व सर्जनशील कलाकृतींमुळे  विद्यार्थ्यांना विविध विषयांचे व्यावहारिक पैलू प्रत्यक्ष अनुभवता आले.

सर्व सहभागी विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे संपर्क अभियान उपक्रम अत्यंत यशस्वी ठरले. विविध कनिष्ठ महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी प्रदर्शनांचे विशेष कौतुक करत महाविद्यालयातील आधुनिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल उत्सुकता व्यक्त केली. एकूणच हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आंतरशाखीय शिक्षण, कौशल्यविकास आणि शैक्षणिक जागरूकता निर्माण करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top