नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*



4kNews कामोठे दि. 3

खारघर पोलीस ठाणे, गुन्हा नोंद क्रमांक ४६२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ७४ अन्वये दाखल गुन्ह्यातील अनोळखी लाल रंगाची थार जीप व अनोळखी आरोपीचा शोध घेण्याबाबत मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सूचना व आदेशानुसार गुन्हे शाखा, कक्ष ३, पनवेल हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. 


  तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये वाहनाचा क्रमांक MH 43 AR 6335 असा दिसून आला. सदर क्रमांकाची पडताळणी केली असता, तो क्रमांक मारुती वॅगन-आर (Maruti Wagon R) या गाडीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपलब्ध फुटेज, वेगवेगळ्या कॅमेऱ्यांचा पाठपुरावा (Follow-up) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) नोंदींनुसार लाल रंगाच्या एकूण ६२ नोंदणीकृत थार जीपच्या माहितीची छाननी करण्यात आली.



   त्याद्वारे सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव अली उर्फ तालिब अहसन नखवी (वय ३० वर्षे, रा. देवकी अपार्टमेंट, प्लॉट क्र. ११५, रूम क्र. ६०१, सेक्टर ५०, सीवूड्स, नवी मुंबई) असे असून, त्याने गुन्ह्यात वापरलेल्या लाल रंगाच्या थार जीपचा मूळ आरटीओ क्रमांक MH 20 FU 3751 असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सदर आरोपीचा शोध घेतला असता, तो बोनकोडे गाव, कोपरखैरणे येथे मिळून आला. त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता, त्याने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली.

*आरोपीचा पूर्व अभिलेख*
1) नेरुळ पो स्टे. गुन्हा नोंद क्रमांक ३५/२०२१, भा.दं.वि. कलम ३५४(अ), ३५४(ब), ३६३, ३२३, ५०४, ५०६ इत्यादी अन्वये विनयभंग व इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
सदर आरोपीस नमूद गुन्ह्याच्या तपासाकामी ताब्यात घेऊन, त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी व कायदेशीर कारवाईसाठी खारघर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

*उघडकीस आलेले गुन्हे:*
१) खारघर पोलीस ठाणे, गुन्हा नोंद क्रमांक ४६२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ७४.
२) खारघर पोलीस ठाणे, गुन्हा नोंद क्रमांक ४६३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटर वाहन कायदा कलम १८४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top