नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार

4kNews कामोठे

उरण, दि. २७ (विठ्ठल ममताबादे) : नागाव गोसपाडा (पिंपळआळी) येथील श्री बाबदेव मित्रमंडळाच्या समाजमंदिरातील पिलर जीर्ण झाल्याने इमारतीची अवस्था धोकादायक झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते वैभव यशवंत कडू यांच्याकडे केली.



परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागाव-म्हातवली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष तसेच आई मांगीनदेवी पारंपरिक मच्छीमार सोसायटी, नागावचे चेअरमन वैभव कडू यांनी तत्काळ पुढाकार घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून, गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणारा संभाव्य धोका टळला आहे.
सामाजिक बांधिलकीतून सहकार्य केल्याबद्दल श्री बाबदेव मित्रमंडळाच्या वतीने वैभव कडू यांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे समाजमंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top