नवीन बातम्या
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली


4kNews कामोठे
नवी मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : नवी मुंबई गुन्हे शाखा (कक्ष-१, वाशी) पथकाने सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करून ७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून सहा सोन्याच्या चेन आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.



खारघर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर नौशाद मुस्ताक आलम ऊर्फ सागर (कामोठे) आणि प्रशांत राजू मगर ऊर्फ प्रशांत वाघमारे (कोपरखैरणे) यांना अटक करण्यात आली. 



चौकशीत आरोपींनी खारघर, कोपरखैरणे आणि रबाळे परिसरातील आणखी पाच जबरी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. दोघांविरुद्ध यापूर्वीही चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ६९.९५ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या चेन तसेच होंडा शाइन मोटारसायकल जप्त केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष-१, वाशी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top