नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित

4kNews कामोठे

पनवेल, दि. 23(संजय कदम) : पनवेल परिमंडळ-३ मधील सात पोलीस ठाण्यांच्या पोलिसांनी चोरीच्या ४८ गुन्ह्यांची उकल करून १ कोटी २२ लाख ९४ हजार २६७ रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. यामध्ये १४० मोबाईल फोन, १२९ ग्रॅम सोने, ४७ तोळे चांदी, आठ वाहने आणि १७ लाख ३४ हजार ७०० रुपयांच्या रोकडसह अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. या कारवाईमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-३ अंतर्गत पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, खारघर आणि तळोजा या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. संबंधित गुन्ह्यांचा तपास करून चोरीस गेलेल्या वस्तू शोधण्यात पोलिसांना यश आले. 



पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ तसेच पनवेल व खारघर विभागांच्या सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करून तो तक्रारदारांना परत करणे शक्य झाले. या कामगिरीमुळे पोलिसांचे कौतुक होत असून, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top