नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

4kNews कामोठे
पनवेल, दि. 23 (प्रतिनिधी) : गावात ग्रंथालय उभे राहत नाही, तोपर्यंत गावाचा खऱ्या अर्थाने विकास होत नाही, असे परखड मत ज्येष्ठ गजलकार, साहित्यिक आणि माजी सनदी अधिकारी डॉ. ॲड. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले. पनवेल येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन व पायाभरणी समारंभात ते बोलत होते.



‘पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आणि संस्कृतीची निशाणी आहे,’ असे सांगत त्यांनी श्रीलंकेतील जाफना शहराचे उदाहरण दिले. बॉम्बहल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या जाफना शहरात ग्रंथालयाची भव्य इमारत पुन्हा उभारण्यास प्राधान्य देण्यात आले, असे त्यांनी नमूद केले. सर्व भाषा भगिनी असून उर्दू भाषाही आपलीच आहे, असे सांगत त्यांनी ग्रंथालयाच्या नव्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.



वाचनालयाच्या अध्यक्षा ॲड. सुनीता जोशी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. इमारतीचे वास्तुशिल्पी मंदार नाडगोडी यांनी प्रकल्पाची माहिती देताना, वाचनालयाच्या मालकीच्या साडेचार गुंठे जागेत सुमारे दहा हजार चौरस फुटांची, चार मजली आणि पाच कोटी रुपये खर्चाची इमारत उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. इमारतीचा दर्शनी भाग आकर्षक असून, त्याची रचना एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे.



या समारंभाला महापौर नितीन पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, वाचनालयाचे माजी अध्यक्ष अनंत सिंगासने, शशिकांत बांदोडकर, ए. के. शेख, के. गो. लिमये यांच्या नात दीपा पाटणकर, पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत गुर्जर, रायगड जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, माजी नगरसेवक रमेश गुडेकर, दर्शना भोईर, निर्मला म्हात्रे आणि ज्येष्ठ वाचक दत्तात्रेय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. तसेच टिकावाच्या साहाय्याने प्रतीकात्मक खोदकाम करण्यात आले. इमारतीच्या उभारणीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन पाटील, रामशेठ ठाकूर आणि जे. एम. म्हात्रे यांनी दिले.
कार्यक्रमाला विविध सामाजिक व साहित्यिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक आणि वाचक उपस्थित होते. युवा साहित्यिक विशाल पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्येष्ठ साहित्यिक व माजी शिक्षण संचालक रोहिदास पोटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top