नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान

‘4kNews कामोठे

कळंबोली, दि. 23 (प्रतिनिधी) : ‘क्रांती सम्राट’ वृत्तपत्राच्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना पत्रकारितेतील कार्याचा गौरव म्हणून ‘न्यायसखी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी कळंबोली येथे आयोजित कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.



न्यायसखी महिला व बलात्कार समितीच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या संस्थापक-अध्यक्षा ॲड. भूमिका जाधव आणि ‘संविधान पर्व न्यूज’चे संपादक चंद्रकांत जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, समाजातील अन्याय-अत्याचार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारांच्या माध्यमातून केले जाते. जनतेचा आवाज बुलंद करणे आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या कार्याचे महत्त्व या पुरस्काराच्या निमित्ताने अधोरेखित झाले.



दिपालीताई पारसकर यांना मिळालेला हा सन्मान ‘क्रांती सम्राट’ वृत्तपत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top