नवीन बातम्या
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

*कळंबोली केएल-४ परिसरातील झाडांची छाटणी; नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा*

4k. News कामोठे दि  25
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील केएल-४ परिसरात वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच व्यापारी वर्गाला होत असलेला त्रास लक्षात घेऊन नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांच्या माध्यमातून झाडांची आवश्यक छाटणी करून घेण्यात आली.


केएल-४ परिसरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर तसेच विद्युत वाहिन्यांच्या दिशेने वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. नागरिकांनी ही बाब नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून कार्यवाही करून घेतली.
या कामाच्या वेळी भाजपा नेते बबन बारगजे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी दिवसभर उपस्थित राहून परिसरातील नागरिक श्री. महेंद्र खबाले, श्री. वैभव फाळके तसेच व्यापारी वर्गासोबत कामाची पाहणी केली. महानगरपालिकेचे सुपरवायझर श्री. आतिश चौधरी यांच्या समन्वयाने झाडांच्या छाटणीचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी सहकार्य केले.


झाडांच्या छाटणीच्या कामासाठी आवश्यक असलेली वाहने व इतर साधनसामग्री घटनास्थळी आणण्यासाठी तसेच कामाच्या ठिकाणी अडथळा निर्माण करणारी वाहने हटविण्यासाठीही बबन बारगजे यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ झाले आणि छाटणीचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले.
या कामामुळे केएल-४ परिसरातील रस्ते व पादचारी मार्ग मोकळे झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच विद्युत वाहिन्यांच्या जवळील वाढलेल्या फांद्यांचा धोका कमी झाल्याने परिसरातील सुरक्षिततेतही सुधारणा झाली आहे.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून काम करून घेण्याला प्राधान्य देत असून, परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न केले जातील, असे भाजपा नेते बबन बारगजे यांनी सांगितले.
या कामाबद्दल केएल-४ परिसरातील नागरिक व व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त करून नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे आणि भाजपा नेते बबन बारगजे यांचे आभार मानले

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top