नवीन बातम्या
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.



4kNews कामोठे
उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे )थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत Taurus The Gym चे मालक  अभय धनाजी ठाकूर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावल्याचे त्यांनी भारताची शान उंचावली आहे. त्यांच्या या यशामुळे खोपटे गाव,उरण तालुक्यासह रायगडच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विश्वविजेता अभय ठाकूर यांनी ७५ किलो वजन गटातील Bench Press प्रकारात २०० किलो वजन लिफ्ट उचलून भारतासाठी सुवर्णपदक मिळवले. तसेच Equipped Bench Press प्रकारातही सुवर्णपदकाची कमाई करत त्यांनी एकूण दोन सुवर्णपदकांचा मान मिळवला.
थायलंडच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली ही कामगिरी निश्चितच युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान अभय ठाकूर यांनी मिळवला आहे.


Taurus The Gym परिवारासाठी तसेच संपूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेली ही दोन सुवर्णपदके उरणच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठेवा ठरणार असून, आगामी काळात अनेक युवा खेळाडूंना पॉवरलिफ्टिंगकडे वळण्यासाठी त्यातून नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या अभय धनाजी ठाकूर यांच्या या दमदार कामगिरी बद्दल सर्वच क्षेत्रातून  शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय अभय ठाकूर यांनी त्यांचे नातेवाईक, मिस्टर इंडिया मिस्टर वर्ल्ड पदकाचे मानकरी प्रतिक दर्णे,इंडिया मिस्टर एशिया मिस्टर वर्ल्ड मिस्टर पदकाचे मानकरी भूषण पाटील,taurus जिम फॅमिली, मित्र परिवार यांना दिले आहे  आहे.या सर्वांमुळेच हे यश गाठल्याचे अभय ठाकूर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top