नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

अखेर सहा वर्षांनी रत्नाकर म्हात्रे यांच्या बाजूने निकाल


4k News कामोठे
जसखार ग्रामपंचायत सदस्य हेमंत ठाकूर यांचे सदस्यत्व रद्द
उरण, दि. 23 (विठ्ठल ममताबादे) : जसखार ग्रामपंचायतीचे सदस्य हेमंत ठाकूर यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी दिला. या निर्णयामुळे गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणात रत्नाकर म्हात्रे यांच्या तक्रारीला यश मिळाले आहे.



जसखार येथील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत रत्नाकर म्हात्रे यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी हेमंत ठाकूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात त्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा केला होता. अखेर या प्रकरणावर निर्णय देताना जिल्हाधिकाऱ्यांनी हेमंत ठाकूर यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top