पनवेल दि. २४ (संजय कदम ) : तळोजा येथील जागृती रिटॅबीलिटेशन सेंटरचे परिसरामध्ये साफसफाईचे काम करीत असताना रुग्ण कोठेतरी निघुन गेला असल्याची घटना घडली आहे.

मिंटा कुमार असे या इसमाचे नाव असून त्याचे वय ५३ वर्षे, रंग-गोरा, उंची ०५ फुट ०१ इंच, अंगाने जाड, नाक सरळ, डोळे काळे, केस पांढरे व समोरुन टक्कल पडलेला, दाढी-पांढरी लहान, अंगात फिकट गुलाबी रंगाचा गोल गळ्याचा टीशर्ट व काळ्या रंगाची पेंट घातलेली आहे.

त्याला भाषा हिंदी बोलता येत असून सदर इसमाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे (०२२२७४१२३३३) किंवा पोलीस नाईक सुर्यकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.
