नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

मे.आय.एम.सी.लि. जेएनपीटी, न्हावा शेवा येथे कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपन्न.








4k समाचार
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )
मे.आय.एम.सी.लि., जेएनपीटी, न्हावा शेवा, ता.उरण, जि. रायगड मधील कामगारांच्या वेतनवाढीचा करार शनिवार दि.०६/०९/२०२५ रोजी संपन्न झाला. सदर कंपनी वेगवेगळ्या प्रकारची रसायने, खाद्यतेले याचा मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठा करीत असते. आवश्यकतेनुसार ग्राहक आपला माल घेऊन जात असतो. यामधून कंपनीला भाडे पोटी मोठा नफा होत असतो. सदर कंपनी मध्ये कोकण श्रमिक संघ ही मान्यता प्राप्त युनियन आहे. कामगारांच्या वेतनवाढीचा मागील करार संपुष्टात आल्यानंतर वेतनवाढीबाबत मागणी पत्र कंपनीला देण्यात आले. नवीन वेतनवाढीचा करारनामाबाबत कामगार नेत्या जनरल सेक्रेटरी ऍड.श्रुती शाम म्हात्रे, सेक्रेटरी- एकनाथ ठोंबरे, स्थानिक युनिट अध्यक्ष रविंद्र भोईर, धर्मेंद्र ठाकुर,रविंद्र ठाकूर,  किरण घरत कामगार कमिटी व कंपनीचे अधिकारी हरेष सविता, व्हॉइस प्रेसिडंट सरतेज यादव, जनरल मॅनेजर, नवलेश कुमार रिजनल हेड,नेहरु सुब्रम्हण्यम सि. मॅनेजर फायन्सस, जी. के. श्रीधरन, आय. आर. यांनी वारंवार चर्चा केल्या. चर्चे अंती एकमत झाल्यानंतर दि.०६/०९/२०२५ रोजी सदर वेतनवाढीच्या करारनाम्यावर सह्या करण्यात आल्या. 

कंपनीसोबत सलग हा चौथा करार करण्यात संघटनेला यश आले आहे. पाच वर्षे कालावधी करीता कामगारांना एकूण रुपये २१०००/- पगार वाढीचा करार करण्यात संघटना यशस्वी झाली. जेएनपी एरियामध्ये आजपर्यतची हि सर्वात मोठी पगारवाढ कामगारनेत्या डॉ. श्रुती म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली झाली आहे. कामगारांनी जल्लोशात श्रुती म्हात्रे यांचे अभिनंदन केले. खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाने विसर्जना दिवशी कामगारांना मोठी भेट दिली आहे. यामुळे कामगारांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह पसरला असून कामगारांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. सदर वेतनवाढीपोटी कामगारांना मुळ पगार, पर्सनल पे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, धुलाई भत्ता, शैक्षणिक भत्ता याचे फायदे कामगारांना मिळणार आहेत. त्याचबरोबर कुटुंबाकरीता तीन लाखापर्यंत मेडिक्लेम पॉलिसीचे फायदे, रुपये एक लाख रक्कमेचा वैयक्तिक अपघाती विमा याचे फायदे कामगारांना मिळणार आहेत. सदर करारनाम्यामधील कामगारांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top