नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

कामोठे मधील सबस्टेशनसाठी महावितरणला भूखंड ताबा द्यावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी 


 
4k समाचार दि. 10
पनवेल (प्रतिनिधी) वीज ग्राहकांना अखंड वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कामोठे सेक्टर २५ येथील नवीन सबस्टेशनचे काम लवकरात लवकर सुरु होण्याची आवश्यकता असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला प्रस्तावित भूखंडाचा ताबा देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे. माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी कामोठे येथे सबस्टेशन उभारण्याची मागणी केली होती. मात्र कोरोना काळ व इतर तांत्रिक बाबीमुळे हा विषय रेंगाळत राहिला होता त्या अनुषंगाने डॉ. अरुणकुमार भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सदरचा विषय मांडला होता. तो मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार महेश बालदी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत उपस्थित होते. 


         या संदर्भात दिलेल्या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि,  पनवेल, कामोठे या परिसरांतील वाढते नागरीकरण व वाढती लोकसंख्या यामुळे विद्युत पुरवठ्याची वाढती मागणी यावर उपाययोजना म्हणून कामोठे सेक्टर २५, भूखंड क्रं.२५ येथे नवीन ३३/११ केव्ही सबस्टेशन उभारण्याचे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीतर्फे ठरविले होते व त्याप्रमाणे गेली काही वर्षे त्यांचेमार्फत सदर भूखंड ताब्यात मिळणेकरिता सिडकोकडे प्रयत्न चालू होते. सदर भूखंड ताब्यात देण्याकरिता सिडको प्रशासनाने भाडेपट्टा रक्कमेसह अन्य रक्कम भरण्याबाबत महावितरणकडे कळविले होते. 

त्यानुसार महावितरणने प्रथम १० टक्के रक्कमेचा भरणा केल्यानंतर आता उर्वरित सर्व रक्कमेचा भरणा महावितरणतर्फे करण्यात आला असून तसे त्यांनी सिडको महामंडळाला कळविले असून तरी पुढील प्रक्रियेच्या अनुषंगाने सदर भूखंडाचा ताबा महावितरणला त्वरीत देणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करावे, जेणेकरून लवकरात लवकर सबस्टेशनचे काम पूर्ण करून नागरिकांना अखंडीत वीजपुरवठा करणे महावितरणला शक्य होईल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top