4k समाचार दि. 11
नवी मुंबई, खांदेश्वर (प्रतिनिधी): खरेदी करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात इसमाने संध्याकाळी दुकानात घुसून लाखोंची चोरी केल्याची घटना खांदेश्वर, सेक्टर १६ येथे घडली. महेश स्पोर्ट्स अँड सर्विसेस या दुकानात सुमारे सव्वा सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

दुकान मालक महेश धोत्रे यांना खरेदीच्या नावाखाली बोलत असताना त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे २ तोळ्यांची सोन्याची चैन आणि मोबाईल हिसकावून नेला. पाहता पाहता तो गर्दीतून पसार झाला. घटनास्थळी एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या इसमाचे वय अंदाजे २१ ते २२ वर्षे असून त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. महेश धोत्रे यांनी तात्काळ खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
