पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः मा.आ.बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापचे कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरवभाई पोरवाल यांनी समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविला.

या उपक्रमात आकाश म्हात्रे, पंडित गोवारी, आलोक अंधाले, रमेश गोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि नितीन पगारे यांनी सहकार्य करत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांना स्वच्छता आणि घरगुती दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले.
त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स (घरातील साबण, पावडर यांसारखाच दैनंदिन गरजेचा घटक म्हणून), कंगवे, हेअर ऑईल, बॉडी लोशन, निर्मा पावडर, कपड्यांचा साबण, आणि इतर आवश्यक घरगुती साहित्य, घरातील साबण, पावडर, तेल जसे दैनंदिन गरजेचे असतात, तसेच सॅनिटरी नॅपकिन्सलाही साधेपणाने आणि सन्मानाने घरातील गरज मानले पाहिजे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविल्याबद्दल गौरवभाई पोरवाल यांचे कौतुक होत आहे.
