पनवेल दि. २३ ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हद्दीतील विविध शाळा व महाविद्यालयात सायबार सेल संदर्भात मार्गदर्शन केले .
यावेळी सायबर सेलच्या माध्यमातून कोणालाही ओटीपी नंबर देऊ नये , अनोळखी लिंक ओपन करू नयेत ,सोसलमीडियाचा कमीत कमी वापर करावा , कुठल्याही आमिषाला बळी पडू नये ,अनोळखी इसमांना तसेच अकाउंटला सोशल मीडियावर फॉलो करू नये , अनोळखी फोन तसेच इसमांना आपली वैयक्तिक माहिती ,आधार कार्ड ,पॅनकार्ड देऊ नये असे मार्गर्दर्शन करण्यात आले . त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थिनींना गुड टच ,बॅड टच संदर्भात माहिती देण्यात आली .

रहिवासी सोसायट्यांमध्ये भाडेकरू ठेवताना त्याची पूर्ण माहिती पोलीस ठाण्याकडे व सोसायटी कडे असलीच पाहिजे ,सोसायटीच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत ,सुरक्षारक्षक नेमल्यास त्याची माहिती सुद्धा संबंधित सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे असली पाहिजे . यासह इतर महत्वाच्या विषयावर पोलिसांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले आहे .
