नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने केली जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

4k समाचार
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने आज शहरातील लक्ष्मी वसाहत येथील अविनाश शिंदे यांच्या छताला पत्रा असलेल्या घरामध्ये धाड टाकून केलेल्या विशेष कारवाईत 8 जणांना ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे.


पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना लक्ष्मी वसाहत येथे बेकायदेशीररित्या जुगार अड्डा चालवून तेथे रोख रक्कमेचा वापर करून 13 पानी पत्ते लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.सुनील वाघ, पोउपनि. हजरत पठाण, पो.ना.रवींद्र पारधी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीररित्या जुगार खेळणार्‍या आठ जणांना ताब्यात घेतले 

असून त्यांच्याकडून रोख रक्कम जुगार खेळण्यासाठी वापरलेली हस्तगत केली आहे व त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे कलम 4 (अ), 12 (अ) अन्वये कारवाई केली आहे. यामुळे बेकायदेशीररित्या जुगार तसेच इतर व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top