नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.

4kNews कामोठे दि. 24
पनवेल /भरतकुमार कांबळे
महाराष्ट्र राज्याच्या प्रगतशील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गणल्या गेलेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काल दिनांक 22 जुलै 2026 रोजी  देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड झाली.याप्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी सभापती नारायण शेठ घरत, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, शेतकरी कामगार पक्षाचेमहाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे. तसेच पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपसभापती  सुनील दुकल्या सोनावळे, सुभाष हरिभाऊ पाटील,अशोक गणू गायकर, बाळकृष्ण नारायण पाटील प्रताप चंद्रकांत हातमोडे, रामचंद्र आत्माराम पाटील, सखाराम गंगाराम पाटील, अर्जुन पांडुरंग गायकर, सौ.ललिता गोपीनाथ फडके, महादू गोपाळ पाटील,  देवेंद्र अनंत पाटील, मच्छिंद्रनाथ गणा  पाटील, सोमनाथ जनार्दन म्हात्रे, दिनेश ज्ञानेश्वर महाडिक, आतिश दत्ता पाटील. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश दत्तात्रय   नाईक  आदी मान्यवर उपस्थित होते. 


  ही निवड प्रक्रिया जिल्हा उप तनवीर पाटील अलिबाग रायगड  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली  l. सभापती पदासाठी एकच नाव आल्यामुळे देवेंद्र गंगाराम मढवी हे  सभापतीपदी बिनविरोध झाल्याचे त्यांनी जाहीर केले.पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश दत्तात्रय  नाईक यांनी यावेळी ही निवडणूक पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले.
 यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी सांगितले भविष्यकाळात पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचालीमध्ये भरीव कामगिरी करण्यासाठी आम्ही नेते मंडळींनी नवीन तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचे निश्चित केले आणि याचसाठी देवेंद्र मढवी यांची सभापती पदी निवड करण्यात आली. 

पुढे त्यांनी सांगितलं पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  भरभराटीसाठी हे नूतन संचालक मंडळ मेहनत घेतील. नवनिर्वाचित सभापती देवेंद्र मढवी यांना शुभेच्छा देताना काशिनाथ पाटील यांनी सांगितले शेतकरी कामगार पक्षांमध्ये नेहमीच कार्यकर्त्यांचा मान राखला जातो. गंगाराम मढवी हे शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र देवेंद्र गंगाराम मढवी हे पक्षाचे काम निष्ठेने करत आहेत  जेव्हा त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाकली जाते ते पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात आणि ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही असा त्यांचा काम करण्याचा हातखंड असल्यामुळेच आम्ही लोकांनी त्यांची सभापती या पदासाठी निवड केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top