हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण

4K News  कामोठे
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
तळोजा फेज-1 येथील पिसारवे गावातील शांती पार्क, आनंद बी-विंग येथे राहणाऱ्या कांबळे कुटुंबावर हिंदू देवी-देवतांचा अवमान व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हा आरोप खोटा असल्याचे तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी स्पष्ट केले आहे. 


कांबळे कुटुंबाचा आरोप आहे की, गेल्या दोन वर्षांपासून त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणारे एकनाथ कुंजीर, भाग्यश्री कुंजीर, ऐश्वर्या कुंजीर आणि सुदर्शन कुंजीर हे सातत्याने त्यांना जातीय स्वरूपाचा त्रास देत आहेत. तसेच जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. 


या प्रकरणी संबंधित चौघांविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
यासंदर्भात भीम आर्मी, नवी मुंबई अध्यक्ष नितेश यादव आणि उपाध्यक्ष रोहित घोडके यांनी 23 जुलै रोजी तळोजा पोलीस ठाण्यासमोर निवेदन देत इशारा दिला की, पुढील पाच दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top