पनवेल दि. १८ (संजय कदम) : प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साई नारायण बाबा आश्रमात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर आरोग्य शबीर श्री सत्यसाई सेवा संस्था पनवेल, भारत विकास पॅरिस पनवेल व इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक यांच्या मार्फत करण्यात आले होते. यावेळी शेकडो साई सेवकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. या निमित्ताने मोफत औषदांचे सुद्धा वाटप करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे यंदाही या मोफत आरोगु तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी, सेक्रेटरी रामलाल चौधरी, राम थडानी, डॉ शकुंतला भटिजा यांनी दिली.
