नवीन बातम्या
Matt: Anthropic Employment
Open Channels FM: Open Web vs Walled Gardens, Simplifying the Difference
गव्हाण येथील बंद खाणीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन
खानावळे येथील नवरात्रोत्सवात मंगेश लबडे यांनी घेतले देवीचे दर्शन
पनवेलमध्ये तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद
एसटी स्टँड परिसरातून ताब्यात; बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन
क्राफ्ट पेपरच्या दरवाढीने कोरुगेटेड बॉक्स उद्योग अडचणीत  बॉक्सच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ स्वीकारण्याचे ग्राहकांना आवाहन; दर स्थिर ठेवण्याची WICMA ची मागणी
मुंबई जीपीओमध्ये ‘फिलॅटली दिवस’ उत्साहात साजरा
डाक तिकिटांतून भारताचा इतिहास, संस्कृती व जैवविविधतेची ओळख
झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगचा आयपीओ १५ ऑक्टोबरपासून खुला होणार प्रति शेअर किंमतपट्टा १४३ ते १५१ रुपये; १९ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीची संधी
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नेते रोहित ढाले पोलिसांच्या ताब्यात

गव्हाण येथील बंद खाणीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

4kNews कामोठे दि. 16 उरण (वार्ताहर) : उरण तालुक्यातील गव्हाण येथे बंद खाणीजवळ नोव्हेंबर २०२४ मध्ये आढळलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी उरण पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.  ९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ज्ञानेश्वर इस्टेट कंटेनर यार्डच्या मागील बाजूस असलेल्या दांडाच्या बंद खाणीजवळ ही घटना घडली […]

खानावळे येथील नवरात्रोत्सवात मंगेश लबडे यांनी घेतले देवीचे दर्शन

4kNews कामोठे दि. 16पनवेल : खानावळे ग्रामस्थ मंडळातर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त भाजपाचे पोयंजे विभाग पंचायत समिती अध्यक्ष तथा उद्योजक मंगेश लबडे यांनी सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा करून सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.  याप्रसंगी उत्सवाचे आयोजक, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पनवेलमध्ये तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद
एसटी स्टँड परिसरातून ताब्यात; बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन

4kNews कामोठे दि. 16 पनवेल (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेने राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान तिहेरी हत्याकांडातील पाहिजे असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दीपक फतेसिंग सुरडकर (वय ४४, रा. सोमठाणा, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव असून, त्याला पुढील कारवाईसाठी बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पनवेल एसटी स्टँड परिसरात […]

क्राफ्ट पेपरच्या दरवाढीने कोरुगेटेड बॉक्स उद्योग अडचणीत  बॉक्सच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ स्वीकारण्याचे ग्राहकांना आवाहन; दर स्थिर ठेवण्याची WICMA ची मागणी

4कन्यूज कामोठे मुंबई, दि. 14 (अजित मोहिते) : क्राफ्ट पेपरच्या किमतींमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे कोरुगेटेड बॉक्स उत्पादकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कच्च्या मालाचा खर्च वाढत असताना तयार बॉक्सच्या विक्रीदरात पुरेशी वाढ होत नसल्याने उत्पादकांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी बॉक्सच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ स्वीकारावी आणि पेपर मिल्सनी दर स्थिर ठेवून देशांतर्गत बाजारात पुरेसा […]

मुंबई जीपीओमध्ये ‘फिलॅटली दिवस’ उत्साहात साजरा
डाक तिकिटांतून भारताचा इतिहास, संस्कृती व जैवविविधतेची ओळख

4kNews कामोठे मुंबई, दि. 14(अजित मोहिते) : राष्ट्रीय डाक सप्ताह २०२६ अंतर्गत मुंबई जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे १२ ऑक्टोबर रोजी ‘फिलॅटली दिवस’ साजरा करण्यात आला. डाक तिकिटसंग्रहाची आवड विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये वाढविणे, तसेच तिकिटांच्या माध्यमातून भारताचा इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक वारशाची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या निमित्ताने मुंबई जीपीओमध्ये विषयाधारित […]

झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगचा आयपीओ १५ ऑक्टोबरपासून खुला होणार प्रति शेअर किंमतपट्टा १४३ ते १५१ रुपये; १९ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीची संधी

4kNews कामोठे  दि.14 राष्ट्रीय, दि. १२ ऑक्टोबर : झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला होणार आहे. या आयपीओसाठी प्रति समभाग १४३ ते १५१ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया १४ ऑक्टोबरला होणार असून, सर्वसामान्य गुंतवणूकदारांना १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. या […]

CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नेते रोहित ढाले पोलिसांच्या ताब्यात

4kNews कामोठे दि. 14 परळ येथील राहत्या घरातून कारवाई; ताब्यात घेण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणीमुंबई (अजित मोहिते) : मुंबईतील विद्यार्थी नेते रोहित ढाले यांना ११ ऑक्टोबर रोजी परळ येथील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. ढाले यांना कोणत्या कायदेशीर तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आले, […]

‘बॉयलर इंडिया २०२६’चे उद्घाटन; २५० प्रदर्शकांचा सहभाग सात देशांतील कंपन्यांचे प्रतिनिधित्व; तीन दिवसांत १८ ज्ञानसत्रांचे आयोजन

4kNews 14मुंबई (अजित मोहिते) : नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्रात ८ ऑक्टोबर रोजी ‘बॉयलर इंडिया २०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात सात देशांतील २५० प्रदर्शक सहभागी झाले असून, औद्योगिक उष्णता, वाफ आणि ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे.  उद्घाटनप्रसंगी वस्त्रोद्योग […]

Back To Top