नवीन बातम्या
पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी
५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श
पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 
खारघरमधील स्पामध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश; तीन पीडित महिलांची सुटका, व्यवस्थापकासह एकाला अटक
पनवेल आरटीओ कार्यालयातील कथित अनधिकृत दलालीविरोधात १९ ऑगस्ट रोजी आंदोलन
Hyve 2.0: Answers Right Away, Better Branding, Captures Leads

१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन

१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. २६ जून २०२५ –
जगभरात तब्बल १६ अब्ज ऑनलाईन अकाउंट क्रेडेन्शियल्स (युजरनेम आणि पासवर्ड) लीक झाल्याचे उघडकीस आले असून, भारत सरकारच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने याबाबत गंभीर इशारा देत नागरिकांना तात्काळ आपले पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे.



या लीकमध्ये Apple, Google, Facebook, Telegram, GitHub यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सच्या युजर्सची माहिती समाविष्ट असून, VPN सेवा वापरणाऱ्यांचीही क्रेडेन्शियल्स आणि मेटाडेटा लीक झाल्याचे सांगण्यात आले आहे. लीकचा अहवाल CyberNews या नामवंत वेबसाइटने सर्वप्रथम प्रसिद्ध केला.

CERT-In च्या प्राथमिक तपासानुसार, हे संयुक्त डेटासेट असण्याची शक्यता असून त्यामध्ये काही जुने अथवा पूर्वी बदलले गेलेले पासवर्ड देखील असू शकतात. मात्र, सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याने, CERT-In ने नागरिकांना पुढील उपाययोजना करण्याची सूचना दिली आहे:

सर्व ऑनलाईन खात्यांचे पासवर्ड तात्काळ बदला

मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) सुरू करा

शक्य असल्यास पासकी (Passkey) चा वापर करा

संगणक व मोबाईल डिव्हाइसवर अँटीव्हायरस स्कॅन करा

सर्व सिस्टीम्स व सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा


सदर डेटा लीकमुळे नागरिकांच्या सोशल मीडिया, ईमेल, बँकिंग आणि क्लाऊड सेवांवरील गोपनीयतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिजिटल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर त्वरित पावले उचलणे गरजेचे असल्याचे CERT-In ने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top