कामोठे (4K News) – नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या काही बनावट व्यक्ती स्वतःला महापालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा रेशन दुकानदार असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे फसवे लोक विविध बहाण्यांनी नागरिकांना गोंधळात टाकून त्यांच्याकडून आर्थिक लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद व्यक्तीबरोबर व्यवहार करताना काळजी घ्यावी, तसेच अशा व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांचे ओळखपत्र किंवा अधिकृत कागदपत्र तपासून घ्यावेत.

कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा फसवणुकीची घटना घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल.”

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
कोणतीही शंका वाटल्यास त्वरित कामोठे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून ओळखपत्र मागण्याचा आपला हक्क वापरावा.
फसवणूक झाल्यास घाबरून न जाता त्वरित माहिती द्यावी.
संपर्क:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे –
8655354114
कामोठे पोलीस ठाणे –
