नवीन बातम्या
पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी
५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श
Open Channels FM: Software Lock-In and AI Tools for Modern Web Businesses
How to Get a 90+ PageSpeed Score in WordPress for Free (Measured)
Open Channels FM: How AI Agents Target Open Source and Why Storage Is the New AI Bottleneck
पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 

बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे उदघाटन


पनवेल दि.०९ (4kNews) : तळोजा येथील कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे उदघाटन आज एमजीएम हॉस्पिटलचे चेअरमन डॉ सुधीर कदम यांच्या हस्ते करण्यात आलॆ. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमाला पनवेलचे सुप्रसिद्ध डॉ गिरीश गुणे, कळंबोली येथील सत्यम हॉस्पिटलचे डॉ हिमा बरनवाल, नोबल केअर हॉस्पिटलचे डॉ खालिद देशमुख, तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन बबनदादा पाटील, ट्रस्टी व शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, ट्रस्टी बाळा मुंबईकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला.

याप्रसंगी बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या प्राचार्य, एलएलएमचे हेड डॉ नाईक, प्रा वैशाली, बी. फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य डॉ मिताली पाटील, डी फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य डॉ अर्चना हिवसे, माजी प्राचार्य काकेकर, एस व्ही कॉलेजचे प्राचार्य डॉ राहुल कांबळे, दि इलाईट पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अलका मॅडम, इलाईट ज्यू कॉलेजच्या प्राचार्य राणे, काईनाथ कमळू पाटील हायस्कुलचे मुख्याध्यपक बोराटे, बी के पाटील कॉलेजचे प्राचार्य निलेश गोंधळी, ए.बी.पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ गोडबोले व इतर शिक्षक, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top