सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाची सिंधुदुर्गातील दिव्यांग क्रिकेटपटूना मदत* राष्ट्रीय दिव्यांग महिला क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातुन महाराष्ट्राचा संघात निवडण्यात आलेल्या दिव्यांग खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघा तर्फ पनवेल स्टेशनवर स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

मंडळाच्या जेष्ठ सदस्यां श्रीमती संध्या मिराशी यांनी दिवंगत जेष्ठ सदस्य सूर्यकांत मिराशी यांच्या स्मरणार्थ मध्यप्रदेश भोपाळ येथे क्रिकेट सामने खेळण्यासाठी जाणाऱ्या या खेळाडूंना प्रवास खर्चासाठी पंधरा हजार रुपये दिले होते सोबत त्यांना मंडळाच्या सदस्यां तर्फे भेट वस्तू देण्यात आल्या.

अध्यक्ष श्री केशव राणे यांनी त्यांची पनवेल मधील राहण्याची व्यवस्था केली होती.पनवेल स्टेशनवर खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मनोहर मराळ,दीपक तावडे,प्रदीप रावले,बाबाजी नेरुरकर,प्रसन्न कुमार घागरे,मंगेश सावंत,स्वप्ना राणे तसेच इनरव्हीलच्या अध्यक्षा शुभदा भगत (मिराशी), सचिव शुभांगी बहिरा ही सर्व मंडळी जमली होती.साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांनी सिंधुदुर्ग मंडळाच्या वेळोवेळी होणाऱ्या मदतीबद्दल आभार मानले,

दिव्यांगसाठी होणाऱ्या कार्यात सहभागी होऊन दिव्यांग खेळाडूंना आधार आणि शुभेच्छा दिल्याने त्यांच्यात उत्साह आला आहे त्यामुळे आपले खेळाडू उत्कृष्ट खेळ करून आपल्या महाराष्ट्राचे आणि सिंधुदुर्गाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करतील अशी भावना रुपाली पाटील यांनी व्यक्त केल्या.
