नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा सन्मान

पनवेल (4kNews*) रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, तसेच राज्यातील विविध भागात शास्त्रीय संगीत आणि भजन संगीतचा प्रचार व प्रसार करत सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपले आयुष्य वेचणारे ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने सहस्रचंद्र सोहळा समारंभपूर्वक संपन्न झाला. विशेषत्वाने बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हृद्य सोहळा पार पडला.


धार्मिक आणि सामाजिक समारंभ असलेल्या या सोहळ्यात  ह .भ.प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे पूजन करण्यात आले. त्यांनतर जवळपास ५० किलो पैशाची नाणी, मिठाई आणि सुकामेवा या साहित्यातून तुला करण्यात आली. विशेष म्हणजे  बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मातोश्री पार्वती यांचा सहा वर्षांपूर्वी सहस्रचंद्र सोहळा झाला होता. त्यानंतर हा सन्मान निवृत्तीबुवा चौधरी यांना मिळाला. त्यामुळे निवृत्तीबुवा चौधरी यांच्या रूपाने भजन परंपरेचा अलौकिक सत्कार या निमिताने झाला.


 ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे झालेल्या या सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.  मूळचे पनवेल तालुक्यातील रांजणपाडा येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीतून हजारो शिष्य घडविले. संगीत क्षेत्राच्या उत्थानासाठी त्यांनी ६० वर्षापेक्षा जास्त काळ अविरतपणे काम केले आहे. आजही त्यांचे हे कार्य पुढे सुरूच आहे.

त्यांच्या शिकवणीतून तयार झालेले शिष्यांचीही या क्षेत्रात नाव उज्वल केले आहे.  ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे कार्य समाजाला नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले आहे. त्या अनुषंगाने त्यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या देखरेखीत हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंददायी भावनेतून संपन्न झाला.


दरम्यान या सोहळ्यात निवृत्तीबुवा चौधरी यांचे सुश्राव्य भजनही झाले. त्यानंतर रायगड भूषण पं. उमेश चौधरी, शिवमाला पाटील, श्रुती पाटील यांचे अभंग गायन झाले. त्यांना नादब्रम्ह साधना परिवाराने साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top