नवीन बातम्या
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण

५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात

4kNews कामोठे दि. 18

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. 



स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय हँडबॉलपटू डॅनियल एन्थानी, मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. मनोज वर्मा आणि सहसचिव डॉ. व्ही. बी. नाईक उपस्थित होते.



या स्पर्धेत ५२ महाविद्यालयांच्या मुलांच्या संघांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर, प्रा. सरस्वती कोरडे यांच्यासह जिमखाना विभागातील सदस्य परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top