गोळेगाव येथे साईबाबा मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

4kNews कामोठे
पनवेल, दि.८ (वार्ताहर) : येथील श्री साईबाबा मंदिराचा प्रथम वर्धापन दिन धार्मिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.  


वर्धापन दिनानिमित्त साईबाबांची पूजा, आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा साईभक्तांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. सन्मान स्वीकारताना म्हात्रे यांनी आयोजकांचे आभार मानून समाजहिताचे कार्य पुढेही सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली. 


कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ, साईभक्त तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोकभाऊ समाजी चौधरी, नरेशकुमार गोपाळ शेटे, शिवाजी तांबे, सुभाष कृष्णन खांडे, रामशाम कृष्णन स्वामी, ज्ञानेश्वर दत्तात्रय चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा संदेश जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत वर्धापन दिन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top