नवीन बातम्या
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त


4kNews कामोठे
पनवेल, दि. 25 (प्रतिनिधी) : कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. करंजाडे परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कथित कॉल सेंटरवर छापा टाकून चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी लॅपटॉप, मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधत होते. विविध फायनान्स कंपन्यांच्या नावाने बोलून कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यानंतर प्रोसेसिंग फी, विमा, होल्डिंग चार्ज, जीएसटी आदी कारणे सांगून ऑनलाइन पद्धतीने पैसे उकळले जात असल्याचे तपासात समोर आले.



माहितीच्या आधारे पनवेल शहर, सायबर पोलीस व कळंबोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने २१ ऑगस्ट रोजी करंजाडे येथील निलगिरी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी विजय बाबू भंडारी (३६), तुषार अरुण पिंगळे (३४), रोहित रंगाप्पा गौडा (२१) आणि दर्शन उमाशंकर (२१) यांना ताब्यात घेण्यात आले.



पोलिसांनी आरोपींकडून तीन लॅपटॉप, १५ मोबाईल, विविध बँकांचे सात डेबिट कार्ड, ३१ सिमकार्ड, ७४ हजार ४०० रुपये रोख, हिशोबाच्या दोन वह्या, एक डायरी, वाय-फाय राउटर व नेटवर्क टर्मिनल डिव्हाइस असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त मथुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, अभिजीत अभंग तसेच पनवेल शहर, सायबर आणि कळंबोली पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top