नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश

‘
4kNews कामोठे
पनवेल, पळस्पे फाटा आणि रीस येथे चार शाळांतील ९७ विद्यार्थ्यांचा सहभाग
पनवेल, दि. 23 (संजय कदम) : रस्ते सुरक्षा, वाहतुकीचे नियम आणि जबाबदार वाहनवर्तनाबाबत जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनतर्फे ‘ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात चार शाळांमधील ९७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



न्यू पनवेल येथील एचडीएफसी सर्कल, पळस्पे फाटा आणि रीस (रसायनी) येथे विद्यार्थ्यांनी फलक, घोषवाक्ये आणि बॅनरच्या माध्यमातून वाहनचालकांना रस्ते सुरक्षेचा संदेश दिला. यात रोटरी स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन, बालाजी इंग्लिश स्कूल, छत्रपती शिवाजी स्कूल आणि संजीवनी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि रस्त्यावर जबाबदारीने वागणे यामुळे अपघात टाळता येऊ शकतात, हे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असून रस्ते सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेशही या अभियानातून देण्यात आला.



रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. अभियानाच्या यशस्वितेसाठी सहभागी शाळा, शिक्षक आणि रोटेरियन यांनी सहकार्य केले, अशी माहिती क्लबचे सचिव रोटेरियन अॅड. हितेश राजपूत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top