कामोठा, सेक्टर-10 येथील शेकाप पक्षाच्या कार्यालयाजवळील कॉर्नर परिसरात एका मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करून तब्बल ११ नागरिकांना चावा घेतला. जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय, पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक […]
सलूनमधील टीव्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत का?; मार्गदर्शक सूचनांची गरज असल्याची नागरिकांकडून मागणी
सलूनमधील टीव्ही आणि ग्राहक सुरक्षा : चर्चेची गरज?प्रतिनिधी | 4K समाचारसलूनमध्ये लावण्यात येणारे टीव्ही हे ग्राहकांच्या मनोरंजनासाठी असतात. मात्र, काही ग्राहकांकडून आणि नागरिकांकडून अशी चिंता व्यक्त केली जाते की, काही ठिकाणी सेवा देताना टीव्हीमुळे कामगारांचे लक्ष क्षणभर विचलित होऊ शकते. केस कापणे, दाढी करणे किंवा धारदार साधनांचा वापर करून सेवा देताना पूर्ण एकाग्रता आवश्यक असते. […]
कामोठ्यातून नव्या नेतृत्वाची पहाट! समाजकार्याने घडलेले व्यक्तिमत्त्व – शुभम रमेश तुपे निवडणुकीत दमदार एन्ट्री..
कामोठे: 15 नोव्हेंबर (4K समाचार) परिसरात शिक्षण, समाजसेवा आणि मानवी मूल्यांची भक्कम परंपरा पुढे नेणारे नाव म्हणजे शुभम रमेश तुपे. SGT इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश गुलाब तुपे यांचे पुत्र म्हणून त्यांच्यावर लहानपणापासूनच सामाजिक जबाबदारीची शिकवण रुजली आहे. शाळा प्रशासनात काम करताना त्यांनी समाजासाठी कार्य करणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणून स्वतःची वेगळी […]
कामोठेमध्ये “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” महाआरोग्य शिबीराचे आयोजन …
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने “सेवा समर्पण पंधरवाडा” उपक्रमाअंतर्गत स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान महाआरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमाला मा. नगरसेवक दिलीप पाटील, माँ नगरसेवक अरुणकुमार भगत, जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, कामोठे शहर प्रमुख सुनिल (भाऊ) गोवारी, सगरभाऊ पाटील प्रतिष्ठान कामोठे, तालुका उप […]
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 2038 पर्यंत सुरूच राहणार : शंतनू गोयल
पनवेल :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक श्री. शंतनू गोयल यांनी 4K न्यूज चॅनलला दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाचे काम उद्घाटनानंतरही पुढील अनेक वर्षे सुरू राहणार आहे. त्यांनी सांगितले की, दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले तरी विमानतळाच्या संपूर्ण प्रकल्पाला पूर्णत्व यायला अजून वेळ लागणार आहे. कारण या विमानतळावर २ धावपट्ट्या (Runways), ४ टर्मिनल्स (Terminals) व […]
कामोठ्यात अतिक्रमणाविरोधात कारवाई : ११ हातगाड्या जप्त व अनेक गाड्या JCB द्वारे तोडण्यात आल्या
कामोठे:(4KNews)पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती – कामोठे अंतर्गत वाढत्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागल्याबाबत वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींना अनुसरून, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी अतिक्रमण पथकाने मोठी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान कामोठे परिसरातील एकूण ११ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर या गाड्या JCB द्वारे तोडण्यात आल्या, अशी माहिती प्रशासनाने दिली. […]
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव मिळणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेला ठोस आश्वासन
पुणे (4K News)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार असून प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा केंद्र सरकार आदर करेल, असे ठोस आश्वासन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी पुणे येथील सरितानगरी येथे आयोजित जनता दरबारात ना. मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी […]
कामोठ्यातील ३ वर्षांपासून प्रलंबित पेट्रोल पंप लवकरच सुरू होणार – भाजप पदाधिकाऱ्यांचा विश्वास
4k समाचार पनवेल दि.25 (वार्ताहर) : कामोठे शहरातील नागरिकांना गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत ठेवणारा पेट्रोल पंप लवकरच सुरू होणार आहे. कामोठे मंडळ भाजपा पदाधिकाऱ्यांनी सेक्टर १८ येथील पेट्रोल पंपाची पाहणी करून संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी मंडळ अध्यक्ष विकास घरत आणि समाजसेवक रवी गोवारी यांनी पेट्रोल पंपाच्या मालकाशी दूरध्वनीवर संवाद साधत अडथळ्यांची माहिती […]
नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने व्हावे – पत्रकारांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी..
मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले. पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले […]
कामोठे, सेक्टर 18 चा पेट्रोल पंप नागरिकांच्या सेवेत दाखल होणार – भाजप पदाधिकाऱ्यांची ग्वाही
कामोठे शहरातील नागरिकांना गेली तीन वर्षे प्रतीक्षा असलेला सेक्टर 18 येथील पेट्रोल पंप आता लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कामोठे :25 Sep (4K समाचार)आज कामोठे मंडळ भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या पेट्रोल पंपाची पाहणी करून थेट मालकांशी संपर्क साधला. मंडळ अध्यक्ष विकास घरत व समाजसेवक रवी गोवारी यांनी पंप मालकांशी दूरध्वनीवर संवाद साधत अडचणी […]
